अंबरनाथ नगरपालिकेवर शिंदेसेनेचा भगवा फडकला

अंबरनाथ : अवघ्या महाराष्ट्रात महानगर पालिकांची रणधुमाळी सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेत मास्टरस्ट्रोक लगावत भाजपावर कुरघोडी केली आणि नगरपालिकेवर भगवा फडकावला.

शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दुर राखण्यासाठी गेल्याच आठवड्यात भाजपने  काँग्रेसच्या पाठिंब्यावर येथे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. या युतीवर टिका होताच  अखेर, काँग्रेसने येथील सर्वच नगरसेवकांचे निलंबन केले आणि त्यानंतर चक्क भाजपनेच या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. पण एनवेळी श्रीकांत शिंदे यांनी, येथील नगरपालिकेत राष्ट्रावदीला स्वताजवळ वळवित  शिवसेनेच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांना  उपनगराध्यक्ष बनवले. आणि  भाजपला दूर ठेवत शिंदेंच्या शिवसेनेनं  राजकीय मात केली. अंबरनाथमध्ये  अनुक्रमे शिवसेना-भाजपचे ३२ विरुद्ध २८ फरकाने  उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खेळीने त्यांनी भाजपाला धोबी पछाड दिला. मात्र, भाजपा आमच्यासोबत आली असती तर आनंद झाला असता, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात असलो तरी सगळ्यांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच, भाजप शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करेल असे मला सांगण्यात आले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत माझं बोलणंही झालं होतं. मात्र, भाजपने भूमिका बदलल्याने आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचेही शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, ३२ नगरसेवकांची संख्या असताना स्वीकृत सदस्य हे शिवसेना महायुतीला तीन मिळायला हवे होते. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी दोनच स्वीकृत नगरसेवक शिवसेना महायुतीला दिले आहेत. त्या संदर्भात अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *