मुंबई, १३ जानेवारी २०२६: भारताची सर्वात मोठी स्मॉल फायनॅन्स बँक आणि युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी रिझर्व बँकेची सैद्धांतिक मंजुरी मिळवणारी पहिली बँक अशी ख्याती असलेली AU स्मॉल फायनॅन्स बँक (AU SFB) देशभरातील ग्राहकांसाठी उत्सवाचा आनंद अधिक लाभदायक करण्यासाठी खास बनवलेल्या ऑफर्स सादर करून मकरसंक्रांतीचा सण साजरा करत आहे.
देशभरातील कुटुंबं हा कापणीचा सण आपापल्या खास पद्धतीने साजरा करण्यासाठी एकत्र येत आहेत, त्यावेळी AU SFB फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, प्रवास, डायनिंग, आभूषणे आणि मनोरंजन वगैरेमध्ये आकर्षक बचत करण्याचे मार्ग प्रदान करून सणासुदीचा आनंद द्विगुणित करत आहे आणि त्यांचा प्रत्येक क्षण संस्मरणीय करण्यास मदत करत आहे.
संक्रांत हा सण देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा होतो: तामिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबात लोहडी, आसाममध्ये माघ बिहू, गुजरातेत उत्तरायण आणि इतर अनेक राज्यांमध्ये मकर संक्रांती. ही नावे भले वेगवेगळी असतील, पण उत्सवाचा आनंद, कृतज्ञता आणि उत्साह मात्र एकसमान आहे. तसेच AU SFB ग्राहकांसाठी देखील या आकर्षक ऑफर्स सगळीकडे सारख्याच आहेत.
सणासुदीची खरेदी आणि लाइफस्टाइल ऑफर्स:
• फॅशन आणि वाणसामान: AJIO वर १०% सूट, स्पायकरमध्ये फ्लॅट ७५० रु. सूट, फ्लिपकार्ट होलसेलवर ५०० रु. सूट आणि इन्स्टामार्ट द्वारे केलेल्या वाणसामानाच्या खरेदीवर १११ रु. पर्यंत सूट
• इलेक्ट्रॉनिक्स: क्रोमा येथे मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीवर १०,००० रु. पर्यंत सूट
• प्रवास: ईझमाय ट्रिप, मेकमायट्रिप, अदाणी वन, पेटीएम फ्लाइट्स, ixigo आणि यात्रा मार्फत केलेल्या फ्लाइट आणि हॉलिडे बुकिंगवर १०,००० रु. पर्यंत सूट; शिवाय अभिबस द्वारा काढलेल्या बसच्या तिकिटांवर १०% सूट.
• डायनिंग आणि मनोरंजन: डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो वर १,००० रु. पर्यंत सूट, स्विगीवर १११ रु. पर्यंत सूट, झोमॅटो ऑर्डर्सवर २०% सूट आणि बुक माय शो तसेच डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो मार्फत काढलेल्या चित्रपटाच्या तिकिटांवर ५०% पर्यंत सूट.
• आभूषणे: स्टडेड आणि हिऱ्याच्या आभूषणांवर फ्लॅट ६००० रु. ची सूट आणि कल्याण ज्वेलर्स येथे सोन्याच्या आभूषणांच्या घडणावळीवर २०% सूट. GIVA येथे चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट १००० रु. सूट.
या सणासुदीच्या ऑफर्स संक्रांतीच्या सणादरम्यान मर्यादित काळासाठी उपलब्ध असून निवडक AU क्रेडिट आणि डेबिट कार्डवर, कार्डच्या प्रकारानुसार लागू आहेत. ऑफर्सच्या संपूर्ण माहितीसाठी तसेच अटी आणि शर्ती जाणून घेण्यासाठी कृपया offers.au.bank.in येथे भेट द्या किंवा AU ०१०१ अॅपवर शोध घ्या.
AU स्मॉल फायनान्स बँकेचे ED आणि डेप्युटी CEO उत्तम टिबरेवाल म्हणाले, “संक्रांत हा कापणी, कृतज्ञता आणि नवीन शुभारंभाचा सण आहे. ही अशी मूल्ये आहेत जी AU स्मॉल फायनॅन्स बँकेच्या दृष्टिकोनाशी साधर्म्य दाखवतात. देशभरातील आमच्या ग्राहकांसाठी या सणासुदीच्या ऑफर्स घेऊन येताना आणि या विशेष कालावधीत त्यांनी केलेली दैनंदिन खरेदी अधिक लाभदायक बनवताना आम्हाला आनंद होत आहे. युनिव्हर्सल बँक होण्याकडे आमची वाटचाल सुरू असताना आमचा फोकस असे अनुभव निर्माण करण्यावर आहे, जे बँकिंगपेक्षा अधिक असतील आणि आमच्या ग्राहकांच्या जीवनात मूल्यवर्धन करतील.”
