पुणेप्रतिनिधी : महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांव सडकून जहरी टिका केली.  खिशात नाही आणा अन्

मला बाजीराव म्हणा… अशी अजित पवारांची अवस्था असल्याचे फडणवीस म्हणाले.

निवडणूकीत मेट्रोतून महिलांना मोफत प्रवासाची खिरापत वाटण्याच्या अजित पवारांच्या घोषणेचा चांगलाच समाचार फडणवीसांनी घेतला. निवडूण यायचे नाहीय मग नुसती आश्वासने द्यायला यांच्या बापाचे जातेय काय असेही फडणवीस म्हणाले.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठी तयारी सुरू असून, त्यांच्या जाहिरनाम्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांसाठी मोफत पीएमपीएमएल बससेवा तसेच मोफत मेट्रो प्रवास अशा आश्वासनांचा समावेश करण्यात आला आहे. या सगळ्यावर फडणवीस यांनी पुण्यातील सभेत सडकून टिका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *