नागपूर : मतदानावेळी वापरण्यात आलेली शाई लगेच पुसली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवर ही तर पराभवानंतरच्या प्रतिक्रियची ते रंगित तालिम करीत असल्याची मिश्किल प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
“शाईबाबतच्या सर्व गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतात याआधीही अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आला आहे जर कोणी याबाबत आक्षेप घेत असेल तर इलेक्शन कमिशन ने या संदर्भात लक्ष दिले पाहिजे पण मला असं वाटतं की काही लोक उद्याच्या निकालाचा अंदाज लावून आजपासूनच काही गोष्टींवर मुद्दाम भाष्य करत आहेत. उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे यातून स्पष्ट दिसून येत आहेत,” असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
“मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. मतदान हे केवळ अधिकार नव्हे तर कर्तव्य आहे. मतदान न करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेसकडून भ्याड हल्ला झाला. निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करणे हा वाईट आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
