इराणमधील खोमेनी यांच्या सत्तेला सुरुंग
इराणमधील खोमेनी सरकारच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला नागरिकांचा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही. इराणमध्ये खोमेनी सरकारच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून जनतेचे मोठे आंदोलन चालू असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५४४ जणांचा बळी गेला असून १० हजाराहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. हजारो आंदोलकांना अटक व ५४ आंदोलकांचा बळी जाऊनही इराणी नागरिक खोमेनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतच आहेत. खोमेनी सरकार हे आंदोलन चिरडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे मात्र आंदोलक कोणत्याही परिस्थितीत आंदोलन थांबवण्याच्या मानसिकतेत नाही. तेथील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भारतानेही इराणमधील आपल्या नागरिकांना लवकरात लवकर इराण सोडण्याचे आव्हान केले आहे. खोमेनी सरकार उलथवून टाकायचेच अशा मानसिकतेत आंदोलक असल्याने हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता आहे. इराणमधील या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाला अमेरिकेची फूस असल्याची चर्चा जागतिक माध्यमात आहे. चीन, रशिया या देशांनी तर तसा थेट आरोपच केला आहे. अर्थात हा आरोप चुकीचा आहे असे कोणीही म्हणणार नाही. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून इराणवर त्यांची वक्रदृष्टी होतीच. इस्राईल – इराण युद्धात ही अमेरिकेने इराण विरोधात भूमिका घेतली होती. इराणमधील खोमेनी सरकार उलथवून टाकणार असे ते कायम म्हणत आले आहेत. इराणमधील खोमेनी सरकार मानव अधिकारांचे उल्लंघन करीत असल्याने इराणवर अमेरिका हल्लाही करू शकते असा सज्जड दमही ट्रम्प यांनी इराणला दिला होता त्यामुळे इराणमधील या आंदोलनाला हवा देऊन खोमेनी यांचा परस्पर काटा काढण्याचा ट्रम्प यांचा डाव असू शकतो. व्हेनेझुएला प्रमाणे इराणमधील तेलसाठ्यावर देखील ट्रम्प यांची नजर आहे. खोमेनी अमेरिकेला ते सहजासहजी ते मिळवू देणार नाही म्हणून ते या आंदोलनाला धगधगत ठेवून खोमेनी यांचा काटा काढत आहे हे सत्य आहे. अमेरिका या आंदोलनाला पेटवत आहे हे जरी खरे असले तरी या आंदोलनाला खोमेनी हे स्वतःही तितकेच जबाबदार आहेत. रियाल हे इराणचे चलन आहे. रियालचे गेल्या काही वर्षात प्रचंड अवमुल्यन झाले आहे. १ लाख ४० हजार रियाल म्हणजे १ डॉलर अशी रियालची अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक भयचित झाले आहे. रियालचे अवमुल्यन झाल्याने तेथे महागाईचा कडेलोट झाला आहे. अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. रियालचे अवमुल्यन होऊन महागाई प्रचंड वाढली, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे देखील आवाक्याबाहेर गेल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. वास्तविक या आंदोलनाची सुरुवात मागील महिन्यातच झाली होती. नागरिक रस्त्यावर उतरत असतानाही महागाई कमी करण्यासाठी आणि रियालचे अवमुल्यन रोखण्यासाठी खोमेनी यांनी कोणतेही पावले उचलली नाही त्याचा फटका त्यांना बसला. मागील महिन्यात तेहरान या इराणच्या राजधानीत सुरू झालेले हे आंदोलन आता इराणच्या ३३ प्रांतात पसरले आहे. हे आंदोलन आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आणखी या आंदोलनात आणखी काही आंदोलनाचा जीव जाऊ शकतो. कदाचित हे आंदोलन खोमेनी यांचे सरकार उलथवूनही टाकेल.
या आंदोलनाचा शेवट काय होईल हे येणारा काळच ठरवेल एकमात्र नक्की की या आंदोलनाने अनेक दशके सुरू असलेल्या खोमेनी यांच्या इराणमधील सत्तेला सुरुंग लागला आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
