प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल
मुकुंद रांजणे
माथेरान : महाराष्ट्र शासन कला संचालनालय, मुंबई, यांच्या अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये घेतल्या गेलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ या परीक्षेत प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, माथेरान या शाळेचा सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल लागला.nइयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग असणाऱ्या या शाळेत केवळ तीन शिक्षक संख्या असूनही शाळेत अनेक उपक्रम आणि विविध स्पर्धांमध्ये शाळेकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. या वर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी तब्बल ३२ विद्यार्थी संघपाल वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविष्ट करण्यात आले होते.
प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्यामार्फत चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेतल्या जातात. दरवर्षी प्राचार्य गव्हाणकर विद्यामंदिर मधील  शिक्षक  संघपाल वाठोरे हे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून या परीक्षेस प्रविष्ट करतात. मागील तीन वर्षांचा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट आपल्या शाळेचा १०० टक्के निकाल आहे. आणि यावर्षीही  शाळेचे एकूण ३२ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.  या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ग्रेड वाईस ७, ५, आणि ३ याप्रमाणे अतिरिक्त गुण मिळतात. शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त शशीभूषण गव्हाणकर, मुख्याध्यापक रमेश ढोले आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.
०००००
पाच लक्षवेधक तंत्रज्ञान नवकल्पनांसह एक्सयूव्ही ७एक्सO सादर
पनवेल: भारतातील आघाडीची एसयूव्हीउत्पादक कंपनीमहिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपली नवीन एक्सयूव्ही ७एक्सO सादर केली. एक्स-शोरूम १३.६६ लाख रु. किमतीपासून सुरू होणारी ७एक्सO ही २०२१ मध्ये सादर झाल्यापासून तीन लाखहून अधिक ग्राहक मिळवणाऱ्या गेमचेंजर एक्सयूव्ही ७००ने निर्माण केलेले मापदंड आणखी उंचावते.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगल्भतेला अभूतपूर्व उंचीवर नेत एक्सयूव्ही ७एक्सO ही प्रीमियमएसयूव्ही अनुभवाचे नियमच नव्याने लिहित आहे.
तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने महिंद्राने सातत्याने प्रयत्न केले असून, एक्सयूव्ही ७एक्सO मध्ये बेस व्हेरियंटपासूनच प्रगत वैशिष्ट्ये देऊन ही बांधिलकी अधिक दृढ केली आहे. सर्व निश्चित मानकांसह कोस्ट-टू-कोस्ट ३१.२४ सेंटीमीटर ट्रिपल एचडी स्क्रीन, इंटलिजन्ट अड्रेनॉक्स, वायरलेस अँड्रॉईडऑटो आणि ॲपल कारप्ले, चॅटजीपीटीसह अलेक्सा बिल्ट इन, क्रुझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट/स्टॉप आणि ७५ सुरक्षा वैशिष्ट्ये असलेला एएक्स व्हेरियंट अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम सुविधा अधिक सुलभ करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *