
अशोक गायकवाड
रायगड- कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी शुक्रवार, २३ जानेवारीला कर्जत येथील प्रशासकीय भवनातील उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विभागप्रमुख, क्षेत्र अधिकारी व टीम लीडर्स यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच कर्जत तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या बरोबर थेट संवाद साधून निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय यंत्रणेला कामकाजादरम्यान भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यास प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी व बैठकीदरम्यान कर्जत निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, अधीक्षक माथेरान सुरेंद्रसिंग ठाकूर, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटूंबे, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, श्रीमती शरयु सावंत, पुरवठा निरिक्षण अधिकारी रविंद्र दळवी, महसूल सहायक संदीप गाढवे, महसूल सहायक जगन्नाथ उबाळे, महसूल सहायक जयंत दबडे, रायगड जिल्हा ग्राम महसूल संघाचे माजी अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे, महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघाचे महिला प्रतिनिधी तथा मंडळ अधिकारी पाथरज, श्रीमती किरण बेलोसकर, तालुका अध्यक्ष प्रवीण गवई, ग्राम महसूल अधिकारी, सजा नांदगाव निलेश पवार, मंडळ अधिकारी चिंचवली श्रीमती वैशाली पाटील, मंडळ अधिकारी कर्जत, श्रीमती शितल मोरे, मंडळ अधिकारी नेरळ, विश्वास गडदे, मंडळ अधिकारी कडाव, अशोक बनसोडे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी संबंधित कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मतदारांच्या सोयीसाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध असून, त्याद्वारे मतदारांना आपले नाव व मतदान केंद्राची माहिती सहज मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी गट संख्या ६ व पंचायत समितीसाठी गण संख्या १२ असून एकूण २२० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ७० हजार ७०२ इतकी असून त्यामध्ये ८४ हजार ७७७ पुरुष व ८५ हजार ९२५ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूणच अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे निवडणूक यंत्रणेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले असून ही भेट सर्वांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
