आंतर कार्यालयीन नोबल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
फ्लेक्सो लिंग संघाला विजेतेपद
ठाणे : फ्लेक्सो लिंग -लेबल डिव्हिजन संघाने ड्रिम एकादश संघाचा २७ धावांनी पराभव करत नोबल प्रिंटिंग प्रेस आयोजित मर्यादित षटकांच्या आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ड्रिम एकादश संघाच्या गोलदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फ्लेक्सो लिंग संघाच्या फलंदाजाना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांना निर्धारित षटकांमध्ये ५ फलंदांज्यांच्या मोबदल्यात फक्त ६८ धावा करता आल्या. त्यानंतर फ्लेक्सो लिंगच्या गोलंदाजांनी फलंदाजांचे अपयश धुवून टाकताना ड्रिम एकादश संघाला ६ बाद ४२ धावांवर रोखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेचे प्रमुख संयोजक विजय चमारिया आणि पराग चमारिया यांच्या हस्ते चषक आणि ११, ००१रुपयांचे रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या ड्रिम एकादश संघाला चषक आणि ५,००१ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
