योनेक्स सनराईज मल्टी डिस्ट्रिक्ट मास्टर्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा
निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले
मुंबई उपनगरातील ५९ वर्षीय आनंद विठ्ठलकर यांनी ठाणे जिल्ह्यातील निरंजन शहाणे यांच्यासोबत जोडी करून, ज्यांच्यासोबत ते ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नियमितपणे सराव करतात, ४५+ पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित जोडी जस्टिन जोसेफ आणि प्रेम रोहेरा यांचा १५-६; १५-७ अशा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत जोसेफ अँथनी कुजूर आणि सुधीर कंधारी यांच्या जोडीला १५-५; १५-७ असे आणि उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित महेश छाब्रिया आणि सुमित कौल यांच्या जोडीला १६-१४; १५-८ असे पराभूत केले.
३५+ पुरुष दुहेरी गटात, मुंबई उपनगरातील अव्वल मानांकित आदित्य स्वामी आणि हितेश दुआ यांच्या जोडीने अजय मसंद आणि अंशु सिंग यांच्याविरुद्ध तीन अटीतटीच्या गेममध्ये १५-१०, १३-१५, १५-१३ असा रोमांचक विजय मिळवला. इतर निकाल :-
महिला दुहेरी 3५+ नेहा काकडे आणि स्मिता साळगावकर यांनी नम्रता घोले आणि सोनाली सरकार यांचा १५-9, १६-१4 असा पराभव केला.
मिश्र दुहेरी 3५+ आदित्य स्वामी आणि स्मिता साळगावकर यांनी अंशू सिंग आणि सरला कोटक यांचा १५-७, १५-१३ असा पराभव केला.
महिला दुहेरी 4५+ रोशनी ठाकूर आणि सरला कोटक यांनी दृष्टी कुकरेजा आणि जान्हवी मेहरानी यांचा १५-१३, १५-९ असा पराभव केला.
मिश्र दुहेरी 4५+ प्रेम रोहेरा आणि जानवी मेरानी यांनी जस्टिन जोसेफ आणि चेरिल गॅब्रिएल यांचा १५-७, १५-११ असा पराभव केला.
पुरुष दुहेरी ५५+ अजय विग आणि अविनाश गोडे यांनी प्रशांत मुखर्जी आणि योगेश अरोरा यांचा १५-११, १५-७ असा पराभव केला.
महिला दुहेरी ५५+ नीना बाजपेयी आणि रितू अरोरा यांनी कविता जैन आणि माधवी कुरुंभती यांचा १५-१3, १५-१७, १५-१० असा पराभव केला.
मिश्र दुहेरी ५५+अविनाश गोडे व कविता जैन यांनी आनंद विठ्ठलकर व प्रेरणा साधनकर यांचा १५-८, १५-२ असा पराभव केला. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि TCDBA यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे क्लब येथे ही स्पर्धा पार पडली.
