आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती
शिवसेना उबाठाची मागणी मान्य
मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले. नगरसेवक धरम काळे, ऍड संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *