भारत-युरोपियन युनियनमध्ये
मुक्त व्यापार कराराची घोषणा
नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुचर्चित ‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारतासाठी ऐतिहासिक अशा या युरोपियन संघासोबतच्या मुक्त व्यापार कराराची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
भारत आणि युरोपियन युनियनमधील करार म्हणजे ‘सर्व करारांची जननी’ असल्याचं भाष्य पंतप्रधान मोदींनी केलं आहे. “भारत-युरोपियन युनियन व्यापार करारामुळे भारतातील उत्पादन वाढेल आणि देशातील सेवा आणि संबंधित क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्यास मदत होईल. सर्व करारांची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुक्त व्यापार करारामुळे जागतिक व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास आणखी दृढ होईल”, असं मोदींनी म्हटलं आहे.
