माझा मोठा भाऊ हरपला- एकनाथ शिंदे

ठाणे : “आज माझा मोठा भाऊ हरपला आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली.

आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे. सकाळी सहा वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते,” काल-परवाच एका कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याची आठवण सांगताना शिंदे भावूक झाले.

“आज त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो,” अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.अशा शब्दांत शिंदे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *