महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने
३१ जानेवारीला अजितदादा पवार यांची शोकसभा
मुंबई:-महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या वतीने कबड्डीचे आधारवड संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई, दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क) येथील कबड्डीमहर्षी शंकरराव(बुवा) साळवी सभागृहात शनिवारी  ३१ जानेवारीला दुपारी ११-३० ला आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, पुरस्कार प्राप्त खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू, कार्यकर्ते, सामनाधिकारी व कबड्डीचे चाहते या सर्वांना विनंती करण्यात येते. आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहून या महान क्रीडाप्रेमी नेत्याला श्रद्धांजली अर्पित करावी. अशी विनंती राज्य संघटनेचे प्रभारी अध्यक्ष खासदार गजानन कीर्तीकर यांनी प्रसार माध्यमाद्वारे सर्वांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *