स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन शेत जमीनीची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड माळशेज मार्गावर असलेल्या सायले गावचे हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रेशरच्या प्रदुषणातुन कष्टकरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी नापिक होणार असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन जीवनमानावर परिणाम होणार असल्याने या क्रेशरला सायले ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला असुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये असा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन विरोध दर्शविला असुन जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्टोन क्रेशरच्या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतेच शिवाय शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासवर विपरीत परिणाम होऊन गुणवत्ता ढासळली जाते.त्यातुन निघणाऱ्या धुरळ्यामुळे  परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागते तर काही जणांचे बळी देखील जातात.दरम्यान तो धुरळा शेत जमिनीवर बसला तर ती जमीन नागंरता येत नाही.तसेच त्या जमीनीत खरिब किंवा रब्बी पिक घेता येत नाही.मुरबाड तालुक्यातील कोलठण,माल्हेड,पवाळे,म्हाडस, बांधीवली शिरगाव,गोऱ्याचा पाडा,या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे जमीनीवर व जीवनमानावर त्याचा परिणाम झालेला दिसुन येत आहे.या प्रकारांची आपल्या गावात पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन सायले ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या. ग्रामसभेत बहुमताने ठराव घेऊन या क्रेशरला तिव्र विरोध केला आहे.
कोट
या स्टोन क्रेशरमुळे गावचे परिसरात प्रदुषण होणार असुन तेथे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावातील नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळणार नाहित त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी विरोध करुन तसा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे
-जागृती पानसरे, सरपंच ग्रामपंचायत सायले
कोट
या धोकादायक क्रेशरला सर्व ग्रामस्थांनी विरोध केला असल्याचा ठराव ग्रामसभेत घेतला असुन तो जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केला आहे.
-अशोक बांगर, ग्राम पंचायत अधिकारी.सायले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *