मिरा -भाईंदरमध्ये गुजराती महापौर
मिरा – भाईंदर
महापालिका निवडणुकीनंतर काल महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आले. भाजपाकडून डिंपल मेहता तसेच उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांनी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रुबीना फिरोझ शेख यांनी तसेच उमहापौर पदासाठी शिवसेनेच्या वंदना पाटील यांनी अर्ज भरला. भाजपा 78 सीट जिंकून बहुमतात आहे, काँग्रेसच्या १3 सीट आणि शिवसेनेच्या 3 सीट आहेत. भाजपच्या डिंपल मेहता या दुसऱ्यांदा महापौर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीने आणि मनसेने महापौर हा मराठी व्हावा अशी मागणी केली होती. जर मराठी महापौर न दिल्यास उग्र आंदोलन करू असं ठणकावून सरकारला इशारा दिला होता. ३ फेब्रुवारी रोजी भाईंदर पश्चिम इथे भव्य आंदोलन होणार आहे तरी देखील त्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी मराठी द्वेष करून त्यांच्या भावजय यांना दुसऱ्यांदा महापौर बनवण्यात येणार हे फायनल झालं आहे. यामुळे मिरा भाईंदर महापालिकेत पुन्हा एकदा गुजराती महापौर होणार असल्याची शक्यता आहे. आता शहरात वाद चिघलण्याची शक्यता वाढली आहे. 3 तारखेला सर्व विरोधी पक्ष आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
