एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस
मुंबई : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत एमजेएससी ट्रॉफीसाठी १ फेब्रुवारी रोजी विविध जिल्ह्यातील नामवंत शालेय ४० खेळाडू खेळाडूंमध्ये चुरस राहील. ओमकार मोटे विरुद्ध शाकीब खान आणि दुर्वेश चव्हाण विरुध्द आदिशेष गोफणे यामधील उद्घाटनीय लढत उद्योजक सुशील शेट्ये, क्लबचे पदाधिकारी विजय येवलेकर, सुनील पाटील, महेश शेट्ये आदींच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी ९.१५ वा. होईल. पहिल्या १६ विजेत्यांना आकर्षक पुरस्काराद्वारे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील माहीम ज्यूवेनाइल स्पोर्ट्स क्लबमध्ये स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावण्यासाठी राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, के.ई.स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, आर.बी.शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, हॉली फॅमिली हायस्कूलचा चैतन्य पोमेंडकर, पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे व पुष्कर गोळे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा अर्णव आंजर्लेकर व सोहम जाधव, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, शेठ करमशी कानजी स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण आदी विविध जिल्ह्यातील शालेय कॅरमपटू अटीतटीच्या लढती देतील.
