महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरी स्पर्धेच्या सामन्यात तीन सेटपर्यंतच्या कडव्या झुंजीनंतर तेलंगणाच्या विश्व् विजेत्या के श्रीनिवासने गतविजेत्या आणि स्पर्धेतील प्रथम मानांकन प्राप्त केलेल्या महाराष्ट्राच्या सागर वाघमारेला ६-२५ असा पहिला सेट गमावूनही दुसरा आणि तिसऱ्या सेटमध्ये अनुक्रमे २२-१२ आणि १४-८ असा पराभव करून उपउपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे श्रीलंकेच्या शाहिद हिलमीने आंध्र प्रदेशच्या जनार्धन रेड्डीला पहिला सेट १४-११ असा हरवल्यानंतर दुसरा सेट ११-१८ गमावला होता. परंतु तिसऱ्या सेटमध्ये शाहिद हिलमीने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली आणि २५-१ असा सहज जिंकून उप उपांत्य फेरीतील आपले स्थान टिकवले. बँक ऑफ इंडिया, आय डी बी अय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम ,मड जीन्स आणि बार्बेक्यू नेशनचा आर्थिक सहभाग या स्पर्धेला लाभला असून स्पर्धा अधिक रंगतदार अवस्थेत आपली आहे. श्रीलंकेच्या शाहिद हिल्मीणी तेलंगणाच्या के श्रीनिवासने आपल्या खेळाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्पर्धेत आतापर्यंत २४ व्हाईट स्लॅम आणि १७ ब्लॅक स्लॅमची नोंद झाली असून खेळाडू रोख पारितोषिकाची लयलूट करत आहे.

खुली एकेरी उपउपांत्य पूर्व फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे
महम्मद अरिफ ( उत्तर प्रदेश ) वि वि संजय मांडे ( महाराष्ट्र ) १६-१३, २५-०
चांद युसूफ शेख ( महाराष्ट्र ) वि वि शरद मोरे ( महाराष्ट्र ) ९-१५, १९-७, २३-५, २३-५
महम्मद घुफ्रान ( महाराष्ट्र ) वि वि इर्शाद अहमद ( महाराष्ट्र ) १४-११, २५-२२
अभिजित त्रिपनकर ( महाराष्ट्र ) वि वि सज्जाद शेख ( महाराष्ट्र ) २४-४, २०-२२, १६-११
शाहिद हिलमी ( श्रीलंका ) वि वि ची जानार्धन रेड्डी ( आंध्र प्रदेश ) १४-११, ११-१८, २५-१
अभिषेक चव्हाण ( महाराष्ट्र ) वि वि संदीप दिवे ( महाराष्ट्र ) १७-२४, २२-६, ११-९
झहीर पाशा ( कर्नाटक ) वि वि पंकज पवार ( महाराष्ट्र ) १२-१७, ८-४, १४-९
के श्रीनिवास ( तेलंगाना ) वि वि सागर वाघमारे ( महाराष्ट्र ) ६-२५, २२-१२, १४-८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *