ठाणे :कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यावर विविध थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुने अंजनी पुत्र हनुमान मंदिर असून, वर्षभर अंजनी पुत्र हनुमान सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरात मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी करण्यात आले. सोबतच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील माजी नगरसेविका मालती पाटील अणि रमाकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात रुग्णांना कोणत्या व्याधीची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले होते. पेसमेकर, एनजिओग्राफी, केमोथेरेपी अशा महागडे उपचार यामध्ये समाविष्ट होते.
