भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर ० ठाण्यात पाच वर्षात ४ महापौर आणि ४ उपमहापौर होणार ० नाराजी दुर करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा फॉर्म्युला
ठाणे: ठाणे महापालिकेच्या महापौदपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड विराजमान होणार आहेत. तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महापौर दालनात दोघांनी आपले अर्ज भरले. या दोन्ही पदासाठी इतर कुणीच अर्ज केले नसल्यामुळे त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.
विशेष म्हणजे ठाण्याला आता पाच वर्षांत ४ महापौर आणि ४ उपमहापौर मिळणार आहेत. शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांचं महापौरपद आणि कृष्णा पाटील यांचं उपमहापौरपद फक्त सव्वा वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येणार आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने ठाणे महाालिकेसाठी महापौर आणि उपमहापौरपदासाठी नवा फॉर्म्युला ठरला आहे. सव्वा वर्ष महापौरपद आणि उपमहापौरपद असणार आहे.
शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड या २०१७ ते २०२२ प्रभाग क्र. २० मधून नगरसेवक म्हणून निवडूण आल्या होत्या. त्या नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष २०१७ ते २०१९ होत्या. तसेच ठाणे महानगर पालिका शिक्षण समिती सदस्य (२०२१ ते २०२२) पदही त्यांनी भुषविले आहे. यापुर्वी त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार जाहीर झाला होता. तसेच उत्कृष्ट नगरसेविका म्हणून २०२५ साली त्यांना गौरविण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले छत्रपती संभाजी महाराज शौर्य शिल्पाची निर्मीती त्यांनी केली होती. सिध्दार्थ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमशक्ती चौक, भगवान गौतम बुध्द शिल्प,
सिध्दार्थ नगर गौतम बुध्द विहार निर्मीती करता त्यांनी पाठ पुरावा केला होता.
