आज पाच वाजता होणार शपथविधी ०

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार ०

राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवरांकडेच ०

पार्थ पवारांची खासदारपदी वर्णी लागणार
स्वाती घोसाळकर
मुंबई  : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदसाठी त्यांच्या पत्नी

खासदार सुनेत्रा पवार यांनी आपला होकार कळवला असून रात्री ११ वाजताच त्या बारामतीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दुपारी १२ वाजता विधानभवनात होणाऱ्या विधीमंडळाच्या बैठकीस त्या उपस्थित राहणार असून पक्षाच्या अध्यक्षपदासहीत उपमुख्यमंत्रीपदाची धुराही त्या आता स्विकारणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या खासदारकीच्या जागेवर पार्थ पवार यांची निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयाला आमचा संपुर्ण पाठींबा असेल असे फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

आज विधानभवनातील सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची प्रथम निवड केली जाईल. मग उपमुख्यमंत्री पदासाठी आणि अजित पवारांकडील असलेल्या खात्याबाबतचे पत्रही राज्यपालांना दिले जाईल. सायंकाळी पाचवाजता हा शपथविधी सोहळा राजभवनावर होईल.

राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवारी उत्तराखंडच्या दौ-यावर आहेत ते सांयकाळी मुंबईत परतणार आहेत.त्यांनतर सायंकाळी ५ वाजता लोकभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या रक्षेचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल,मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज वर्षा निवास्थानी जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सुमारे तासभर चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे तातडीने बारामतीला रवाना झाले.बारामतीमध्ये तटकरे यांनी पवार कुटूबिंयांशी चर्चा केल्यानंतर रात्री उशीरा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार मुंबईला निघाले.
अजित पवार यांच्याकडे असलेली वित्त व नियोजन,उत्पादन शुल्क ही खाती राष्ट्रवादीकडेच कायम राहावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते.

सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार

शनिवारी होणा-या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. सुनेत्रा पवार यांच्या निमित्ताने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे.राज्याच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत एकही महिला उपमुख्यमंत्री झाल्या नाहीत.त्यामुळे सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *