बंगळुरू : आयकरच्या धाडी पडताच भारतातील प्रसिध्द उद्योगपती कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन रॉय चिरियानंदन जोसेफ ऊर्फ सी. जे. रॉय यांनी त्या आयकर अधिकाऱ्यांसमोरच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्यामुळे उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.

आयकरच्या धाडी सुरु असतनाच जोसेफ यांनी बंगळुरू येथील लँगफोर्ड रोडवरील आपल्या कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी त्यांच्या कार्यालयात आयकर विभागाची चौकशी सुरू असतानाच अचानक ही घटना घडली. दुबईस्थित कॉन्फिडेंट ग्रुपच्या कार्यालयातच असलेल्या बंगळुरू शाखेत ही आत्महत्येची घटना घडल्याचे सांगण्यात येते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय यांनी कथितपणे स्वतःकडे असलेल्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली.

गोळी लागल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या रॉय यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना नारायण हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, कार्यालयातील कर्मचारी व उपस्थित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.

कॉन्फिडेंट ग्रुप हे रिअल इस्टेट क्षेत्रातील एक नामांकित नाव असून, या घटनेमुळे उद्योगजगतातही शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *