टी.डी.के च्या कामगारांची वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता
अनिल ठाणेकर
नाशिक, नाशिक मधील सातपूर औद्योगिक वसाहतीतील टी डी के प्रा. लि. या कंपनीतील कामगारांना अनेक सेवा आणि सुविधांसह होणाऱ्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला कामगारांच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. कामगार वर्गाने या प्रस्तावाचे उस्ताहाने स्वागत केले असून कंपनी साठी देखील उत्तम आणि दर्जेदार उत्पन्न देण्याचा निर्धार कामगारांनी केला. डॉ. डी एल कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कामगारांच्या सर्व साधारण सभेत राजकीय ठराव पास करण्यात आले.
१) मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हेतू पुरस्कर नाव घेणे टाळले आहे. यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा. २) माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान वेळोवेळी केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील राजकीय वातावरण अस्थिर करण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचा पद्मभूषण पुरस्कार परत घेण्यात यावा.३) त्याच बरोबर १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याबाबत ठराव पारित करण्यात आला. ४) तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधना बाबत देखील श्रद्धांजलीचा ठराव मांडून सर्व कामगारांकडून अजित पवार यांना विनम्र अभिवादन केले.
