करुना फाऊंडेशनतर्फे प्रधानपाडा शाळेला शैक्षणिक साहित्य भेट
ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने शहापूर तालुक्यातील प्रधान पाडा शाळेला करूना फाउंडेशन तर्फे स्मार्ट टीवी तसेच आउटडोर गेम्स,इंडोर गेम्स चे साहित्य वाटप करण्यात आले.तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना देखील खाऊचं वाटप करण्यात आलं
करुणा फाउंडेशन चे अध्यक्ष सागर राजेंद्र राजपूत व उपाध्यक्ष विक्रांत राजपूत यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्य पुढे नेण्याचा संकल्प स्मृतीदिन करण्यात आला यावेळी प्रधान पाडा शाळेचे शिक्षक सचिन निचिते,विजय सातपुते यांनी करुणा फाउंडेशनचे आभार मानले व कौतुक केले.यावेळी प्रधानपाडा गावातील सर्व ग्रामस्थ,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करुना फाउंडेशन चे सदस्य विशेष पाटील,अनिकेत सूर्यवंशी,राज ठाकूर,वरुण भानुशाली,विराट राजपूत,साहिल मांडवकर,हार्दिक शिरसाठ व यश महाडीक या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.करुना फाऊंडेशनने ग्रामीण भागातील शाळेला साहित्य भेट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.या उपक्रमातून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
