माथेरान : मागील एका तपापासून पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू होऊन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी गावातील त्याचप्रमाणे अन्य मंडळींच्या विरोधाचा सामना करत अनेकांच्या कडव्या संघर्षाला सामोरे जात आपला लढा कायम ठेवून अखेरीस आपली ई- रिक्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे हातरीक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत.

सुप्रीम कोर्टाने वीस ई- रिक्षांना परवानगी दिली असून यापुढे हातरिक्षा चालकांच्या हाती लवकरच ई-रिक्षाचे स्टीयरिंग येणार असून या कष्टकरी श्रमिकांच्या संघर्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश असल्याचे ई-रिक्षा प्रेमी बोलत आहेत.

सुप्रीम कोर्टांने दि 10 जानेवारीला ई- रिक्षा हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता.त्याचवेळी सनियंत्रण समितीला ई रिक्षाची संख्या निश्चित करणे व ई-रिक्षाची मार्गिका ठरविण्यास सांगितले होते त्यानुसार सनियंत्रण समितीने 6 मार्चला झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 20 ई-रिक्षांची परवानगी दिली व अहवाल कोर्टाला सादर केला मात्र सनियंत्रण समितीच्या मिनिट्स मध्ये 20 ई रिक्षांचे वर्गीकरण 15 विद्यार्थ्यांना व 5 स्थानिकांना असे करून प्रामुख्याने या ई-रिक्षाच्या सेवेत पर्यटकांचा उल्लेख न केल्याने तर्क वितर्क सुरू झाले होते श्रमिक रिक्षा संघटनेचे वकील ऍड ललित मोहन यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना देखिल देण्याची मागणी केली पर्यटन हाच येथील प्रमुख उद्योग असून दरवर्षी दहा लाख पर्यटक माथेरानला भेट देतात कायद्यात समानता आहे वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोणत्याही समूहाला डावलता येत नाही तसेच वीस हात रिक्षा चालकांनी ई रिक्षा खरेदी केल्या असून पर्यटकांना सेवा दिली तरच त्यांना उत्पन्न मिळू शकते ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. न्या बी आर गवई व न्या संदीप मेहता यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना दिली जाईल असा स्पष्ट आदेश दिला आहे तसेच जे परवानाधारक हातरिक्षा चालक आहेत यांनाच परवानगी द्यावी या चालकांचा  सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत कोर्टाला सादर करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच हात रिक्षा चालकांच्या ई रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.  कोर्टामध्ये ऍड ललित मोहन सोबत ऍड विधे वैश्य व ऍड आकांक्षा यांनी युक्तिवाद केला तर अश्वपाल संघटनेसाठी श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला होता.

पहिल्या टप्यात वीस ई रिक्षांना मिळालेली परवानगी ही हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तीची सुरवात आहे व लवकरच उर्वरित  74 हात रिक्षा चालकांना देखील ई रिक्षाची परवानगी मिळेल ई रिक्षामुळे त्यांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे.

सुनिल शिंदे , याचिकाकर्ते व सचिव श्रमिक रिक्षा संघटना माथेरान

हात रिक्षा चालकांना ई रिक्षाची परवानगी दिल्या बद्दल मा सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक धन्यवाद माथेरानच्या तीव्र चढ उताराच्या रस्त्यावर हातरिक्षा ओढताना मला माझ्या वाढत्या वयोमानानुसार प्रचंड दमछाक व्हायची ई रिक्षामुळे आमच्या आर्थिक परिस्थितीसह आरोग्य सुध्दा निश्चितच सुधारेल.

अंबालाल वाघेला – हातरिक्षा चालक माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *