सापांना रेल्वेत जागा…
रेल्वेगाड्या आणि त्यामधून प्रवास करणारी माणसे बघितली आणि सापांचे (नव्हे प्रत्यक्ष नागोबांचे) चित्त खवळले. ‘हे काय मी जगातला सर्वात मोठा साप मानला जातो आणि मला कधीतरी कुणाच्या तरी घरात किंवा शेतात चक्कर मारायची संधी मिळते. पण आजवर मी रेल्वे नावाच्या वाहनात कधीच बसलो नव्हतो.’ विचार करता करता दक्षिण गोव्यातील चांदोर अथवा चंद्रपुरा येथील कुशावती नदीच्या काठी राहणारे एक नागोबा चक्क रेल्वे रुळाच्या बाजूला येऊन उभे राहिले. आता गाडी आली आणि थांबली की मागच्या दरवाज्याने ते गाडीत शिरणार होते.
नाग हे प्रचंड आकाराचे आणि अत्यंत विषारी सरपटणारे प्राणी किमान भारताला नवील नाहीत. भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणारे असे काही साप आणि नाग आढळले आहेत. थाटले खास हे की जंगल अथवा नदीकिनारा अशा यांचा अधिवास असलेल्या जागेपासून या रेल्वे प्रवासाने ते कुठी जातील याचा नेम सागता येणार नाही. पण प्रवासाच्या मार्गातच चुकून कुण्या माणसाचा हात पाय लागला तर त्याचा जीव जाणारच पण इतरांची अवस्थाही कठीणच व्हायची. यात भीती जशी माणसांना तशीच ती सापानाही असू शकते.
वाहनातून फुकटात अथवा चोरून प्रवास करणाऱ्या जीवांमध्ये माणसासोबत आता साप आणि नाग याचेही नाव आले आहे. सापांच्या अशा सफरी केवळ रेल्वेमध्ये अथवा मोटार आणि इतर वाहने यांच्यातच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असा प्रवास अक्षरश: जहाजामधूनही झाल्याच्या बातम्या असायच्या असे म्हणतात.
या नव्या विषयाने संशोधकांना अभ्यासाला लावले. दीकांश परमार या ‘जीवशास्त्र’ विषयात डॉक्टरेट पदवीसाठी अभ्यास करणाऱ्या तरुणाने संशोधन सुरु केले. गोव्यातील प्राणी सुटका दलासोबत त्याने आपले काम सुरु केले. गोवा आणि सह्याद्रीच्या प्रदेशात असलेल्या जंगलांमध्ये नागांची वस्ती अधिक आढळते. गेल्या २२ वर्षात सुटका केल्या गेलेल्या नागांची माहिती मिळवताना त्यांच्या असे लक्षात आले की असे साप आता जिथे कधीही नव्हते अशा जागी दिसत आहेत आणि त्यापैकीच एक जागा रेल्वे मार्गाच्या आजूबाजूची असते.
साप आणि नाग हे सरपटणारे प्राणी असल्यामुळे रेल्वेच्या मालगाड्या थांबलेल्या असतात तेव्हा त्यात यांना सहज प्रवेश मिळू शकतो. रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला उंदीर, सरडे, पाली असे तर गाडी थांबली असेल तेव्हा गाडीला लटकलेले छोटे साप हे यांचे खाद्य असते. परमार यांच्या मते सह्याद्री घाटातील नाग ही आज नष्टप्राय होत चालेली प्रजाती आहे पण असा किंवा कोणताही साप जर रेल्वेच्या डब्यात आढळला तर तो विषारी आहे की नाही हे बघण्याअगोदरच त्याची केवळ भीतीपोटी कत्तल केली जाईल. काही नाग आजही रेल्वेतून प्रवास करीत असण्याची शक्यताही परमार यांनी व्यक्त केली असून माहिती नसलेल्या जागी नाग पोचणे ही गोष्ट त्याच्यासाठी आणि माणसासाठीही धोका ठरू शकते.
‘स्नेक्स ऑन ए प्लेन’ हा चित्रपट २००६चा असला तरी ही केवळ कथा आहे असेही म्हटले गेले होते. हे संशोधन ‘बायोट्रॉपिका; या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाचे सर्पवैज्ञानिक मॅक्स जोन्स यांच्या मते हा प्राणीशास्त्रासाठी एक चांगला संशोधनाचा विषय ठरू शकतो…
काहीतरी नवीन…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
