माटुंगा ढाल क्रिकेट स्पर्धा

बालमोहन शाळेचा‌‌ मोठा विजय ‌

मल्हार करंडेचा शानदार अष्टपैलू खेळ

मुंबई. ..एम.जी .एस. एम ने आयोजित केलेल्या , माटुंगा ढाल   क्रिकेट स्पर्धेत,पहिल्या फेरीत  बालमोहन विद्या मंदिर इंग्लिश  सीबीएसई  शाळेने  आय.ई.एस.मुलुंड शाळेचा ३०९ धावांनी दणदणीत पराभव केला.अष्टपैलू खेळ करणारा मल्हार करंडे त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता.

बालमोहन विद्या मंदिर शाळेने ३७० धावांचे मोठे  आव्हान आय.ई.एस.  मुलुंड शाळेसमोर   विजयासाठी ठेवले. होते. बाल मोहनच्या मल्हार करंडे याने ९८ चेंडूत ११३  नाबाद धावा ‌ केल्या. त्याला  स्मित ठाकूरने ४२ धावा आणि विवान रेडकरने ३६ धावा करुन  चांगली साथ दिली.

आय.ई.एस.मुलुंड शाळेचा डाव  ६१ धावांमध्येच संपुष्टात आला.मल्हार करंडेने सुरेख अष्टपैलू खेळ करीत ४ बळी देखील टिपले.त्याला अथर्व कासारे , वेद खांबेटे  आणि स्वराज साठे यांनी प्रत्येकी  २ बळी घेऊन छान साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *