प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

जळगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय तसेच के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव येथील क्रीडा संचालक प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (सन २०२५–२६)”   प्रदान करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित विशेष समारंभात पालकमंत्री  गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक (एस. पी.) महेश्वर रेड्डी व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार प्रा. खुशाल देशमुख यांना प्रदान करण्यात आला. प्रा. खुशाल देशमुख यांच्या या सन्मानामुळे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचा तसेच चाळीसगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  प्रा.खुशाल देशमुख यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *