ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका एकता भोईर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
