ज्ञानेश कुमारांवर
ममतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर मुद्द्यावर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर, त्यांनी निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले.”आपण आजवर एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयुक्त बघितला नाही,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे.
आयोगाच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, “आपण अतिशय दुःखी आहोत. प्रदीर्घ काळ दिल्लीच्या राजकारणात राहिलो आहोत. चार वेळा मंत्री आणि सात वेळा खासदार राहिलो आहोत. मात्र, आजवर एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयोग बघितला नाही.” एवढेच नाही तर, केवळ बंगाललाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न करत, ९८ लाख लोकांची नावे मतदार यादीतून परस्पर हटवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
