नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार !
अहमदनगर : सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात लोकसभेसाठी सातशे ते आठशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली आहे. त्या संदर्भात तयारी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तर आत्तापर्यंत पाचशे जणांची तयारी झाल्याचं बोललं जातं आहे. आतापर्यंत सर्वाधिकार जामखेड येथे 104 जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. तर श्रीगोंदा 38, कर्जत 12, नगर तालुका 54, नगर शहर 55, पाथर्डी 48, पारनेर 29 जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचे राम जरांगे यांनी सांगितलं आहे.