आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी समन्वेत महापौर, उपमहापौर यांची भेट घेत केले अभिनंदन
महापौर व उपमहापौर निवडणूकीनंतर आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकारी यांच्यासह महापौर श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौर श्री.दशरथ भगत यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सर्व अधिका-यांनी ओळख करुन दिली व आपल्याकडे असलेल्या विभागांची दिली. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने नागरिकांना अपेक्षित असलेले शहर विकासाचे काम करुया असे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रतिपादन केले.
