मुंबई : ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाइक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियनने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

 तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, संपूर्ण भारतातील ॲप-आधारित ट्रान्सपोर्ट वर्कर्स या संपात सहभागी होणार आहेत. सरकारने किमान भाड्याची अधिकृत अधिसूचना तात्काळ जारी करावी, अशी प्रमुख मागणी युनियनकडून करण्यात आली आहे.

ओला, उबर, रॅपिडो आणि पोर्टर यांसारख्या कंपन्यांसाठी सरकारकडून कोणताही अधिकृत भाडे आराखडा नसल्याने या कंपन्या स्वतःच्या फायद्यानुसार एकतर्फी भाडे ठरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची असुरक्षितता आणि अस्थिर कामाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *