बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले
कल्याण: बल्याणी विभागात पीर वली शाह दर्गा ऊर्स २०२६ निमित्त प्रभाग क्र. 4 मध्ये लावण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसीचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांचे अधिकृत बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची घटना घडली आहे.
या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर कृत्य अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या भावना दुखावणारे आहे.
या घटनेमागील दोषींवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *