सत्यम फाउंडेशनकडून माथेरानच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
मुकुंद रांजाणे
माथेरान : गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर माथेरान या शाळेत सत्यम फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे वेंडिंग मशीन बसवण्यात आले. माथेरान मधील यापूर्वी बीजे रुग्णालय नगरपरिषद दवाखाना आणि नगरपरिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या प्रकारचे वेल्डिंग मशीन लावण्याचे काम सत्यम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. माथेरान सारख्या दुर्गम भागात नवी मुंबईच्या या फाउंडेशन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.
सत्यम फाउंडेशनचे सर्वेसर्वा कुमार सत्यम यांच्या अथक प्रयत्नातून शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आली. यावेळी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री शशी भूषण गव्हाणकर सर शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश ढोले शिक्षक श्री संघपाल वाठोरे, विदुला गोसावी यासह सत्यम फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख कुमार सत्यम, संचालक प्रभाकर तांबें यांसह अन्य उपस्थित होते.
