पिंपरी: अजित पवार जरी आपला मुलगा पार्थच्या पराभव विसरून त्याला पराभूत करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारात गुंतले असले तरी मी माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार म्हणजे घेणारच असा विडा आज रोहीत पवार यांनी उचलला.

मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे रिंगणात उतरले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारयांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे. माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित दादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करतायेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय, अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *