लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले
रमेश औताडे
मुंबई : लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या मंत्रालयात अण्टी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीनं सापळा रचून एका क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले. अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतलं. तपास झाल्यानंतर मग या संबंधित क्लर्क ला ताब्यात घेऊन गेले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आलं.
