फेस्कॉम अध्यक्षांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त यांची सदिच्छा भेट

नवी मुंबई: शनिवारी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) अध्यक्ष डॉ.आण्णासाहेब टेकाळे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या सोबत मुंबई विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे, उत्कर्ष ज्येष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा स्वातीताई फडके, ज्येष्ठ नागरिक संघ ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते व रवी पुजारी हे होते. सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांना भेटून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष बाबत, तसेच ज्येष्ठ नागरिक सुरक्षाबाबत चर्चा, ज्येष्ठाचे प्रश्न सोडवण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

त्यावेळेस सहाय्यक आयुक्त मयूर भुजबळ यांनी सायबर क्राईम तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक, फिशिंग आणि स्पुफिंग, ओळख चोरी, मजबूत पासवर्ड वापरणे, अनोळखी लिंक वर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर न करणे, अँटी व्हायरस वापरणे बाबत उपयुक्त माहिती दिली व काहीही अडचण असल्यास सायबर कक्षाला संपर्क करावा हा सल्ला दिला. फेस्कॉम तर्फे त्यांचे आभार मानले. ज्येष्ठांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मयूर भुजबळ यांनी दिले. नंतर नेरूळ पोलीस स्टेशनचे नविन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कांबळेनी ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *