भिवंडी : मनसेच्या भिवंडी शहरातील अशोकनगर येथील मुख्य कार्यालयाला महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या वेळी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.
या वेळी भाजपाचे आमदार महेश चौघुले, मनसेचे ठाणे-पालघर विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, भिवंडी पूर्व मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी, शिवसेनेचे भिवंडी शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनसेचे डी. के. म्हात्रे, मनोज गुळवी, परेश चौधरी, रवींद्र विशे, विकास जाधव, कामिनी खंडागळे, भाजपाचे माजी नगरसेवक सुमित पाटील, राजू गाजेंगी आदींची उपस्थिती होती.
