भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू

स्लग – गणेश नाईकांची शिंदे पितापुत्रांवर पुन्हा टिका

नवी मुंबई : भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू असे जहरी शब्द वापरत भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या भस्मासुरांनी १० वर्षे महाराष्ट्राला लुटलं, यांची जागा जेलमध्ये असल्याची घणाघाती टीका गणेश नाईकांनी केली.

महापालिका निवडणूकीदरम्यान मला परवानगी द्या शिंदेंचा टांगा पलटी करतो आणि घोडाही फरार करून टाकतो असे वक्तव्य केल्याने वातावरण चांगलेच चिघळले होते. आता त्यापुढे जाऊन माझ्या नादी लागाल तर माजी खासदार करेन असा इशारा भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला.

पक्षाने मोकळीक द्यावीअस्तित्व संपवतो

गणेश नाईक म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या हातात ठाणे, पालघरमधील एकही महानगरपालिका जाऊ देणार नाही. पक्षाने मला फक्त मोकळीक दिली पाहिजे, यांचे अस्तित्व संपवून टाकेन. हे भस्मासूर, बकासूर असून यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ल्याने राज्य १० वर्ष मागे गेले आहे. यांनी केलेले पाप लक्षात आल्यास यांची जागा जेलमध्ये असेल.”

खुमखूमी असेल तर…

श्रीकांत शिंदेंचा पलटवार

श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना त्याच शब्दात प्रत्युतर दिले आहे. गणेश नाईकांना वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे असा टोला खासदार शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना लगावला.

जर जास्त खुमखुमी असेल तर गणेश नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलं. त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *