हर हर महादेव…
महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यातील किसननगर २ विभागातील प्राचीन गंगेश्वर महादेव मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवशंकराचे भक्तिभावाने दर्शन घेत विधिवत पूजा करून दुग्धाभिषेक केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, नगरसेवक प्रकाश शिंदे, नगरसेवक योगेश जानकर, उपविभागप्रमुख सुनील मोरे उपस्थित होते.
