अशोक गायकवाड
रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.
