राजीव चंदने
मुरबाड : निवडणुकीचे रणशिंग फुकताच मुरबाड मधे महाविकास इंडिया आघाडीचा भव्य दिव्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील खुले नाट्यगृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी सुरेश (बाळ्या मामा)म्हात्रे यांनी आपल्या भाषणात खासदार कपिल पाटीलांवर टीका करत म्हणाले की दहा वर्ष खासदार पदाची ज्याना संधी मिळाली तीन वर्ष राज्यमंत्री पद असतांना देखील कुठल्याही प्रकारचे विकास कामे केली नसून फक्त जनतेची दिशाभूल करत निवडणुकी पुरता विकास कामांचा गाजर दाखवायच काम केला आहे, कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत, असा घणाघाती आरोप बाळ्या मामा यांनी महाविकास इंडीया आघाडीच्या मेळाव्यात केला, त्यानंतर ते पुढे म्हणाले की खासदार पदाची संधी मला मिळाली तर अनेक वर्षापासून मुरबाडकरांचा रखडलेल्या रेल्वेचा प्रश्न,मार्गी लावणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आजोळ असलेले आंबेटेंबे गाव येथिल अपूर्ण भीमाई स्मारकाचा काम पूर्ण करणार, यासर्व कामांचा आढावा प्रत्येक वर्षी पत्रकार परिषद घेऊन सादर करणार असे हि यावेळी ते म्हणाले त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा याकरिता त्त्यांच्या साठी वेगळी बाजार पेठ तयार करण्याचे आश्वासन हि दिले, त्याप्रसंगी राष्ट्रवादी(शरद पवार) गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुरबाड तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, शिवसेना उ.बा.ठा उपजिल्हा प्रमुख मधुकर घुडे, मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष विशे, राजाराम निचीते, गणपत टावरे, आम आदमी पार्टीचे ऍड, नितीन देशमुख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुरबाड तालुका महिला अध्यक्षा कविता वारे, दिलीप कराळे,निलेश शिंदे,संजय चंदने, भाविक चंन्ने, अभिषेक डुंकवाल,यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
