४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
अलिबाग : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. मात्र मार्च २०२६ महिन्यातील पहिला सोमवार (२ मार्च) हा होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टीचा दिवस असून ३ मार्च रोजी धुळीवंदनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर असल्याने मार्च महिन्याचा लोकशाही दिन बुधवार, ४ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकशाही दिन दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी दिली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने संबंधित कागदपत्रांसह सादर करून या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *