कर्जत : आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यांत आली आहे. ३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी, १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दुरध्वनी क्रमांक ०२१४८ – २२२०३७, ९३७३९२२९०९ आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे.
