माथेरान : माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला कैलासवासी जश मिलन गांधी यांच्या स्मरणार्थ तिचे वडील मिलन गांधी यांनी 43 इंची स्मार्ट टीव्ही व शालेय वस्तू तसेच खाऊचे वाटप करून कै.जश याचा स्मृतिदिन विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला.
कै. जश गांधी याचे 2020 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.तरुण वयामध्ये आपला मुलगा जाण्याचे दुःख मिलन गांधी यांनी सोसले आहे परंतु त्या दुःखाने खचून न जाता त्याच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात याकरता स्मृती दिनाचे औचित्य साधून मिलन गांधी हे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मित्रमंडळी सह जाऊन गरजूंना मदत करीत असतात यावर्षी त्यांनी माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला प्राधान्य दिले आहे.येथील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला 43 इंची स्मार्ट टीव्ही शाळेला भेट स्वरूपात दिला तर उपस्थित विद्यार्थ्यांना गरजेचे शालेय साहित्य व खाऊचेही वाटप केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना शाळेसाठी लागणारी कोणतीही मदत असल्यास संपर्क करण्याचा शब्दही दिला येथील विद्यार्थ्यांना पाहून या शाळेसाठी आपणास जे काही करता येईल ते करण्यास आपण तयार आहोत असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माथेरानचे नितीन शेळके यांनी विशेष प्रयत्न केले.
