१४वी ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा
श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व
ठाणे : श्री माँ विद्यालयाने ५१ गुणांची कमाई करत सिम्पथेसायझर स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रल्हाद भांगले स्मृती १४ व्या ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात ५५ गुण नोंदवणाऱ्या ठाणे पोलिस स्कूल संघाने अव्वल स्थान मिळवले. मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेत विराज काटकर युग पाटील आणि विहान निकुंभने आपापल्या वयोगटात सुवर्णपदक जिंकले. तर मयांक भोकरे गोळा फेक स्पर्धेत विजेता ठरला.
संक्षिप्त निकाल : मुले ८ वर्षे वयोगट – विराज कोटकर ( सुवर्ण – लांब उडी, २.९३ मिटर), मुले १० वर्षे वयोगट – विहान निकुंभ ( सुवर्ण – लांब उडी, ३.५९ मीटर, रौप्य – ६० मिटर धावणे, ९.६ सेकंद), मुले १२ वर्षे वयोगट – सुवर्ण – ४ X २५ मिटर रिले, १.३६.२ सेकंद, मुले १४ वर्षे वयोगट – युग पाटील ( सुवर्ण – लांब उडी, ४.९५ मिटर, सुवर्ण- ६० मिटर धावणे, ७.९ सेकंद), मयांक भोकरे ( सुवर्ण – गोळा फेक, ११.४६ मिटर, रौप्य – लांब उडी, ४.९२ मिटर), कैफ शेख ( रौप्य – ६० मिटर धावणे, ८.१ सेकंद, कांस्य- लांब उडी, ४.६८ मिटर), अश्विन केंद्रे ( रौप्य – गोळा फेक,९.८१ मिटर). रिले ४X ५० मिटर – सुवर्ण, १.२४.९ सेकंद, रौप्य १.२९.५ सेकंद.
मुली १४ वर्ष वयोगट – वैभवी पुजारी ( कांस्य – ६० मिटर धावणे, ८.९ सेकंद), रिले ४X ६० मिटर – रौप्य १.३३.०३ सेकंद.
