जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड वरील हॉटेल प्रसाद समोरील रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात दुचाकीस्वार युवक वाहनासह खड्डयात पडून गंभीर जखमी झाला आहे. महापालिकेचा हा  निष्काळजीपणा नागरीकांच्या जिवावर उठला आहे. या रस्त्यावर डंपरचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून  दुचाकीचे नुकसान झाले आहे.
संपूर्ण केडीएमसी क्षेत्रात खोदकामे चालु आहेत, ही विकासकामे होत असतांना नागरीकांच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायी चालणाऱ्या नागरीकांचा फुटपाथ सुद्धा उखडून टाकण्यात आला असल्याने नागरिकांना चालणे देखील अवघड झाले आहे. हे काम गेल्या दिड महिन्याहून अधिक काळ या ठिकाणी चालु आहे. एकदा टाकलेले पाईप परत काढून पुन्हा टाकले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आता तरी प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *