नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक
नवी मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(२)(ब) अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी नामनिर्देशनाव्दारे १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक रण्यात आल्याचे जाहीर केले. या १० नामनिर्देशित सदस्यांमध्ये  कुलदिप सुरी, भरत नखाते, जगजीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेढकर, लक्ष्मीकांत पाटील, व्दारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे, अंकुश कदम यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नियुक्त नामनिर्देशित सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *