रक्तदाब नियंत्रणासाठी आधुनिक उपचार
रमेश औताडे
मुंबई: औषधे घेऊनही रक्तदाब नियंत्रणात न येणाऱ्या रुग्णांसाठी मुंबईत परळ येथील ग्लेनइगल्स हॉस्पिटलने मेडट्रॉनिक इंडियाच्या सहकार्याने आधुनिक रेनल डिनर्वेशन थेरपीची सुविधा उपलब्ध झाली आहे. हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका कमी करण्याचा उद्देश या थेरपीचा आहे.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भरत शाह, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. जे. एम. मुड्डी आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत राजपूत यांच्यामार्फत या थेरपी साठी मार्गदर्शन होणार आहे. रुग्णांची सखोल तपासणी, अचूक निदान आणि वैयक्तिक उपचार आराखड्याद्वारे रक्तदाब नियंत्रणावर भर दिला जाणार आहे. ग्लेन ईगल्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन चेवले व मेडट्रॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष संदीप सिंह कुमार यांनी रेनल डिनर्वेशन ही हृदयरोग उपचारातील महत्त्वाची व वाढती गरज असल्याचे नमूद केले.
