जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न
कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांची उपस्थिती
अशोक गायकवाड
अलिबाग: समता फांऊडेशन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अलिबाग जिल्हा कारागृहात “त्वचारोग तपासणी शिबीर” कार्यक्रम संपन्न झाला. या आरोग्य शिबीरात डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) यांनी बंदी बांधवांना त्वचारोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्वचारोग निदान आणि मोफत उपचार यावर भर देण्याच्या अुनषंगाने कारागृहात दाखल २९ बंद्यांची त्वचारोगबाबतची तपासणी करण्यात आली. हे आरोग्य शिबीर अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा,पुणे डॉ. सुहास वारके (भा.पो.से) व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा पुणे योगश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या शिबिर कार्यक्रमाकरिता जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, डॉ.निशिगंधा माळी (वैद्यकीय अधिकारी) अलिबाग, जिल्हा कारागृह, सतिश प्रभाकर जुंबळे, सोमनिंग कट्टेपा कांबळे (कारागृह शिपाई) इत्यादी कारागृह अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *